Daily Mahasatta

Daily Mahasatta

सचिन हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग तपासणी शिबीर

सांगली (प्रतिनिधी) :
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन शहरातील सचिन हॉस्पिटलच्यावतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांपैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबीर होय. हे शिबीर रविवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरामध्ये वंध्यत्वाची कारणे, उपचार व स्त्रीरोग यावर आधुनिक तंत्रावर तपासणी आणि मोफत सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सचिन सुगण्णावर यांनी दिली आहे.

सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मूल न झालेल्या दाम्पत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारावर हॉस्पिटलच्या वतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहोत, असेही डॉ. सुगण्णावर म्हणाले. हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आलेल्या शेकडो मोफत शिबिरामुळे हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. अपत्यहिन दाम्पत्यांच्या जीवनामध्ये आजारावर यशस्वी उपचार करण्याचे कार्य हॉस्पिटलकडून घडत आहे. या शिबिराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषा विषयी मार्गदर्शन व टेस्ट्यूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात येते.

गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणुंचे रोपण, वीर्यपेढी स्त्रीबीज दान, गर्भ गोठवून ठेवणे, आय.व्ही.एफ. आय.सी.एस.आय. आय.एम.एस. आय. व व्हेरिपिकेशन याचबरोबर बंद गर्भनलिका चालु करणे, स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात येते. पुरुष वंद्यत्वामुळे शुक्राणुमधील दोष संख्या कमी असणे, ताकद कमी असणे, शुक्राणु मृत असणे यावर आधुनिक उपचारांची व मायक्रो सर्जरीची माहिती या शिबिरात दिली.

Post a Comment

0 Comments