Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
इस्लामपूर मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षपदी डॉ. राहुल नाकील, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल माळी तर सचिवपदी डॉ. विकास पाटील यांची निवड करण्यात आली. इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र मावळत्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल यांच्या हस्ते देण्यात आले.

याचवेळी इस्लामपूर इंडियन असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. जितेंद्र लादे, उपाध्यक्षपदी डॉ. राम कुलकर्णी, सचिवपदी कृष्णा नलावडे तर खजिनदारपदी डॉ.अमित पाटील यांची निवड करण्यात आली. मेडिकल असोसिएशनच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल, डॉ. डबाणे, डॉ.स्वाती पाटील, डॉ. रेखा माने, दिपाजंली पाटील, डॉ.संगीता मोरे, डॉ. उदयश्री परदेशी, डॉ.सोनल उमराणी यांनी गेलेल्या आर्थिक वर्षाचा आढावा मांडला. डॉ.अतुल मोरे,डॉ. अनिल भोई,डॉ. घट्टे, डॉ. राहुल मोरे,डॉ मंद्रुपकर, डॉ.नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. यावेळी कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. इथून पुढीलही काळात प्रामाणिक, निस्वार्थी भावनेने रुग्णांची सेवा करण्याचा निश्चय सर्वांच्याकडून करण्यात आला.

Post a Comment

0 Comments