Daily Mahasatta

Daily Mahasatta

उद्योगाला अनुभवाची जोड आवश्यक : महावीर जैन

कृष्णा व्हॅली चेंबरच्या वीज व उर्जा वापरातील बचत परिसंवादास उद्योजकांचा उस्फूर्त प्रतिसाद

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड एम. आय. डी. सी. तील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इडस्ट्रीज अँन्ड कॉमर्सच्या वतीने चेंबरच्या सभागृहात आयोजित केलेल्या उद्योजकांच्यासाठी वीज व उर्जा वापरातील बचत या विषयावरील परिसंवादास कुपवाड एम.आय.डी.सी सह परिसरातील उद्योजकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास मुंबईचे ई इफिशियन्सी मॅनेजमेंट कन्सलटन्सी प्रा. लि. चे संस्थापक संचालक सनदी लेखापाल महावीर जैन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते.

या परिसंवादास कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी अध्यक्ष सतिश मालू, व्हा. चेअरमन जयपाल चिंचवाडे सचिव गुंडु एंरडोले, संचालक हरी गुरव, नितीष शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना महावीर जैन म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात विजेचा मोठया प्रमाणात वापर होत असून वीज बचतीसाठी उद्योजकांनी प्रयत्न केल्यास निश्चितच आपला उद्योग फायदेशीर ठरेल. उद्योजकांनी प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला आपण किती वीज वापरतो त्यावर किती खर्च होतो आणि उत्पादन याचा ताळमेळ लावणे गरजेचे आहे. उद्योग धंद्यात केवळ सर्टीफाईड ज्ञान असून उपयोग नाही तर त्यासाठी अनुभवाची जोडही आवश्यक आहे. तरच आपणास उद्योगधंद्यात प्रगती साधता येईल. यावेळी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून उद्योजकांशी संवाद साधला व उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

Post a Comment

0 Comments