Daily Mahasatta

Daily Mahasatta

आरोग्य मंत्र्याच्या हस्ते चक्क स्मशानभूमीत पुरस्कार वितरण

इस्लामपूर (हैबत पाटील) : उरुण - इस्लामपूर येथील लोकराज्य विद्या फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. नामदार डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या अध्यक्षतेखाली उरुण - इस्लामपूर येथील आंबेडकर नगर मधील सार्वजनिक स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती लोकराज्य विद्या फाऊंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिली.

तांदळे म्हणाले, उरुण - इस्लामपूर येथील आंबेडकर नगर मधील सार्वजनिक स्मशानभूमीत रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोकराव शेंडे यांना व सामाजिक कार्याबद्दल इस्लामपूर चे माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, इस्लामपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांतदादा भोसले -पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलदादा महाडिक, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरवभाऊ नायकवडी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, युवक नेते सम्राट महाडिक (बाबा), शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख मा. आनंदराव पवार (बापू), मुख्याधिकारी मा. अरविंद माळी हे मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सन्मानचिन्ह, मानपत्र, काठी व घोंगडे, वृक्ष रोप व अण्णासाहेब डांगे लिखित अहिल्यादेवी होळकर चरित्रग्रंथ देऊन डॉ. अशोकराव शेंडे व माजी नगरसेवक श्री. कपिल ओसवाल यांना सन्मानित करण्यात येणार असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे यापूर्वी ज्येष्ठ संपादक मा. मंगेश मंत्री व उद्योजक मा. सर्जेराव यादव यांना पुरस्कार मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून मोजक्याच प्रमुख लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. संजय ढोबळे ,मानसिंग ठोंबरे प्राध्यापक अरुण घोडके, बजरंग कदम, पृथ्वीराज तांदळे, वैभव खोत, पोपट कोळेकर, ऋतुराज तांदळे डॉ. जयवंत खरात, वैभव वाघमोडे, सुवर्णा कोळेकर, आशाताई तांदळे, रुपाली कोळेकर, बाजीराव हिरवे आदी संयोजन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments