Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूसकर माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा

पलूस (अमर मुल्ला)
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यानिमित्त 'मराठी भाषा गौरव दिनाचे' आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवियत्री सौ सायली मेरू उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक टी. जे. करांडे (सर) सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. के. बामणे सर , एस. एस. पुदाले, एस. डी. सावंत ,सौ. एस. बी. कोळी मॅडम प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सौ सायली मेरू मॅडम म्हणाल्या, आज जगभरात मराठी भाषा बोलणारांची संख्या अकरा कोटीहून अधिक आहे. जगात बावीस अधिकृत भाषा आहेत. त्यामध्ये मराठी आहे. जगात दहाव्या क्रमांकावर आणि भारतात तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा आहे. आज संधी सोडली तर पुन्हा कधीही मिळणार नाही म्हणून आजच वाचन सुरू करा. संतांनी आपली मराठी भाषा समृद्ध केली आहे. माञ इतर भाषांची आक्रमणं पाहता आज मराठी संवर्धनाची वेळ आली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात आज प्रचंड वेगाने चालीरिती संपल्या. परंपरा संपत चालल्या. आपणास भाषा टिकवून धराव्या लागतील. जगभरातील प्रत्येक देशात मातृभाषेत भाषेत शिक्षण दिले जाते. भाषेशिवाय माणूस जगूच शकत नाही. भाषा ही आपली जगण्याची नितांत गरज असून,  या गरजेपोटी आपली मातृभाषा आपण प्राणपणाने जपली पाहिजे असे सांगितले.

    यावेळी बोलताना सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. के बामणे सर म्हणाले, भाषा आपल्या आईप्रमाणे  असते. ती आपणास पोसत असते. वाढवत असते. आपल्याशी संवाद साधत असते. तेव्हा अशी भाषा सदैव आपल्याशी हसती खेळती राहिली पाहिजे. आपण चांगल्या मराठीचा अट्टाहास धरताना; इतरही चारदोन भाषा आत्मसात करायला पाहिजेत. इतर भाषा शिकण्याचा आजचा काळ आहे. तेव्हा विविध भाषांवर प्रभुत्व मिळवून आपण आपले ज्ञान वाढवले पाहिजे. यासाठी आधी आपण आपल्या मातृभाषेवर  प्रेम करायला हवे असे सांगितले. यावेळी ९ वी तील कु. मधुरा करांडे , प्रांजली पाटील, समृद्धी पटकुरे, तनुजा कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.एस.पुदाले, आभार सौ.कोळी मँडम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments