Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जत तालुक्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

जत (सोमनिंग कोळी)
राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार विक्रम सावंत यांनी मुंबई येथे सत्कार केला. 

यावेळी जत तालुक्यातील विविध प्रश्न, पक्षाचे संघटन, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर आ सावंत व आ पटोले यांच्यात चर्चा झाली. आ नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी जत तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी चांगले सहकार्य केले होते, याबद्दल आ विक्रमदादा सावंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी आपल्या नेतृत्वाखाली नेटाने काम करू असे अभिवचन आ सावंत यांनी दिले.

Post a comment

0 Comments