Daily Mahasatta

Daily Mahasatta

वीराचार्य पतसंस्थेचे कार्य सहकाराला दिशादर्शक : शशिकांत राजोबा.

सांगली : वीराचार्य पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन शशिकांत राजोबा, व्हा. चेअरमन जयकुमार बेले, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील.

समडोळी /प्रतिनिधी - अर्थकारणाच्या माध्यमातून सभासदांसाठी वीराचार्य जीवन सुरक्षा ठेव योजना, कर्जदारांसाठी अपघाती विमा योजना, शैक्षणिक सहाय्य योजना, लेक वाचवा अभियान, सामाजिक बांधिलकीतून अखंडितपणे कार्य करणारी वीराचार्य पतसंस्था इतर सहकारी संस्थांना पथदर्शी असून सहकाराला दिशादर्शक आहे, असे उदगार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक शशिकांत राजोबा यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जि. ना. सह पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काढले.

स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन जयकुमार बेले यांनी केले. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच कोरोना आपत्तीतील दिवंगत व्यक्ती, शहीद जवान व संस्थेचे संचालक आदगोंडा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संस्थेचे चेअरमन शशिकांत राजोबा यांनी सभेची नोटीस व वार्षिक अहवाल वाचून संस्था २५१ कोटी ठेवी कडे वाटचाल करीत असून शुन्य टक्के एन. पी. ए. ची परंपरा कायम राखून १२ टक्के लाभांश वाटप केलेचे सांगितले आणि एका मेसेजवर सभासदानी आॅनलाईन सभेस दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. संस्थेने सभासदांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा, ठेवीदारांना जादा दराने व्याज व सभासदांना चांगला लाभांश देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या विविध योजनांची व पतसंस्थांच्या पुढील आव्हाने याबद्दल माहिती दिली आणि संस्थेने महापूर काळात व कोरोनाच्या संकटातही वीराचार्य परिवाराने सेवादूत म्हणून काम केले असून सर्वांच्या सेवेसाठी कायमच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे सांगितले.

प्रमुख अतिथी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी संस्थेच्या अर्थ व समाजकार्याची माहिती दिली व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या आदर्शनानुसार समाजाभिमुख कार्य करत असल्याचे सांगितले आणि कोरोना पासून बचावाचा मंत्र आणि उपाययोजना सांगितल्या. सभेपुढील विषयांचे वाचन सर्वश्री प्रकाश सांगावे, अरुण कुदळे, अरुण पाटील, मोहन नवले, उज्वलाताई आडमुठे, अजित भंडे, डी. के. पाटील, एन. जे. पाटील, राजाराम हराळे, व्यवस्थापक शितल मसुटगे यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments