Daily Mahasatta

Daily Mahasatta

केंद्राचे वागणे हुकूमशाही पद्धतीचे : मंत्री विश्वजीत कदम

सांगली : केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शनिवारी काँग्रेस भवन समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

सांगली, ( प्रतिनिधी)
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन समोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, जितेश कदम आदींनी केले.

इंधन दरवाढीविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी ना. विश्वजीत कदम म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लिटरला शंभर रुपयांच्या घरात गेलेल्या आहेत. गॅसचे दरही पंचवीस रुपयांनी पुन्हा वाढवले आहेत. या दरवाढीमुळे गरीब आणि सर्वसामान्य माणसांच्या जगण्यावर संकट येत आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. केंद्राने लादलेले काळे कायदे रद्द करावेत, यासाठी शेतकरी लाखोंच्या संख्येने कडाक्याच्या थंडीतही नवी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. शेतकरी हा पोशिंदा आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तो देशाचा मायबाप आहे, ही भावना भाजप सरकारमध्ये अजिबात दिसत नाही. शेतकऱ्यांना मोडून काढण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत, उलट त्यांना त्रास देत आहेत. देशातला शेतकरी आणि जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.

यावेळी नामदेवराव मोहिते, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक वहिदा नाईकवाडी, संजय मेंढे, उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, अभिजीत भोसले, फिरोज पठाण, संतोष पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, मनोज सरगर, बबीता मेंढे, आरती वळवळे, शुभांगी साळुंखे, रोहिणी पाटील, मदिना बारूदवाले, पद्मश्री पाटील, कांचन कांबळे, बिपीन कदम, प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, विशाल कलकुटगी, प्रमोद सूर्यवंशी, रवींद्र खराडे, दिलीप पाटील, अल्ताफ पेंढारी, अल्बर्ट सावर्डेकर, अजित दोरकर, नंदकुमार शेळके, माणिक कोलप, धनराज सातपुते, वसिम रोहिले, नितीन कुरळपकर, महावीर पाटील, सचिन जाधव, नरेंद्र महाराज, सौरभ पाटील, अमित पारेकर, योगेश राणे, आयुब निशाणदार, सागर काळे, मयुर पाटील, विजय आवळे, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, रवींद्र वळवडे, राजेंद्र कांबळे, मालन मोहिते, विनायक कोळेकर, सोहेल बलबंड, तौफिक शिकलगार, सचिन जाधव, योगेश जाधव, गजानन मिरजे, आशिष चौधरी, अमोल पाटील, पै. अण्णासाहेब खोत, राजेंद्र कांबळे, प्रशांत येवले, मोईन जमादार, मयाजी शिंदे, अरूण गवंडी, शरीफहुसेन सय्यद, रघुनाथ नार्वेकर, सुरज मुल्ला, अनिल कबुरे, बाबगोंडा पाटील, नामदेव पठाडे, अॅड. भाऊसाहेब पवार, पवन महाजन, अनिल सुगन्नावर, सद्दाम शेख, सचिन चव्हाण, मंदार काटकर, महावीर भोरे, इरफान शिकलगार, तोहिद फकीर, हिरा कांबळे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------

Post a Comment

0 Comments