Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिंचणीतील युवकाने स्वीकारले १५ मुलींचे पालकत्व

कडेगाव ( सचिन मोहिते)
चिंचणी (अं) ( ता . कडेगाव )येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीपती शिवाजी माने यांनी  सोनहिरा परिसरातील इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या  व आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या हुशार व होतकरु १५ मुलींचे एक वर्षासाठी पालकत्व स्विकारले आहे.   त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीपती माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, असे प्रतिपादन भारत पाटील यांनी केले.

ते चिंचणी (अं) ता. कडेगाव येथील श्रीपती शिवाजी माने  यांनी दत्तक घेतलेल्या मुलींचे पालकत्व कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी इंद्रजीत जाधव म्हणाले, कोरोना काळात माणसांनी सामाजिक जबाबदारी म्हणून  गोर गरीब जनतेला मदत ही केली पण ग्रामीण व खेड्या पाड्यात, वाड्या वस्तीवर राहणार्या गरीब लोकांच्या समोर आर्थिक संकट आहेत. आशा कुटूंबात असणार्या हुशार मुलींचे शिक्षण बंद होण्याचे मार्गावर आहे .म्हणून माने यांनी हा उपक्रम सुरू करुन समाजातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

यावेळी सोनहिरा परिसरातील पालक , शिक्षक, विद्यार्थीनी, सामाजिक, राजकिय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व सुत्रसंचलन विशाल माने यांनी केले तर आभार संदेश जाधव यांनी मानले.Post a Comment

0 Comments