Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूरात महाआरोग्य शिबिर संपन्न

इस्लामपूर ( हैबत पाटील)
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कचरे गल्ली, शिराळा नाका, इस्लामपूर येथे श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेज व धनवंतरी हॉस्पिटल आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे चेअरमन मा. प्राध्यापक शामराव पाटील (अण्णा ) व डॉक्टर प्रविण पोरवाल यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले.

प्रमुख पाहुणे प्रा. शामराव पाटील (आण्णा) व डॉक्टर प्रवीण पोरवाल यांचा माजी नगराध्यक्ष अॅड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे व इस्लामपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती मा. श्री विश्वनाथ डांगे (बापू ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिरामध्ये ५५३ लोकांची निरनिराळी तपासणी व उपचार करण्यात आले पैकी ८ लोकांना पुढील उपचारासाठी आष्टा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. यावेळी इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक बशीर मुल्ला, श्री. अभिजीत मोमीन, रफिक पठाण, शकील जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.
Read more news
कोरोना : सांगलीत प्रशासन पुन्हा अलर्ट ; 48 जणांवर दंडात्मक कारवाई 
या महाआरोग्य शिबीरामध्ये ह्रदय, मधुमेह, त्वचाविकार, लकवा मारणे, दमा, स्त्रियांचे विविध आजार, मासिक पाळी तक्रार, सांधी वात, सांध्याचे आजार, मणक्याचे विकार, झोप न लागले, आम्लपित्त, कान-नाक-घसा तपासणी, मोतीबिंदू, गुडघेदुखी, कंबर दुखी , अपेंडिक्स, मूतखडा या आजारावरती तपासणी करून उपचार करण्यात आले. आष्टा येथील डॉक्टर सुरत चौगुले, डॉक्टर पंकज शहा, डॉक्टर सुशांत कणसे, डॉक्टर संजीवनी कटरे, अभिजीत थोरात, सिद्धनाथ मदने, आधी डॉक्टर व स्टाफ यांनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. या शिबिराचे संयोजन मंदार जाधव, अभिजीत रासकर, प्रदीप यामगार, अमोल नाईक, व्यंकटेश रजपूत, प्रशांत यमगर, विनोद पाटोळे, अनिकेत अक्षय पवार, या कार्यकर्त्यांनी केले. या महाआरोग्य शिबिरामुळे शहरासह ग्रामीण भागातील लोकांनाही फायदा झाला आहे.

Post a Comment

0 Comments