Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत सराफाची आत्महत्या, सुसाईड नोट मध्ये नावे लिहिलेल्या आठजणा विरोधात गुन्हा दाखल

सांगली (प्रतिनिधी)
पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून फसवणूक झाल्याने सांगली येथील सराफ व्यवसायिकांने आपल्या दुकानाताच गळफास लावून आत्महत्या केली आहे. या सराफाने आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून आपल्याला आत्महत्या करावयास भाग पाडणार्या आठजणांची नावे उघड केली आहेत. या आधारे संबंधित आठजणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हरीशचंद्र खेडेकर (वय 82) असे आत्महत्या केलेल्या सराफाचे नाव आहे.

सांगली येथील सराफ व्यवसायिक हरीशचंद्र खेडेकर यांची पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर मात्र सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आठ जणांची नाव ठेवली लिहून होती. त्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे अशी -मधुकर खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार, सुनिल पंडित यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मृत खेडेकर यांची मूलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहे सर्व संशयितांचे पैसे देवाण-घेवाणीचे व्यवहार होते. शिवाय, यातील काहींनी मृत खेडेकर यांनाही कर्ज दिले होते. या देवाण-घेवाणीतून फसवणूक झाली आहे. तसेच, अव्वाच्या-सव्वा व्याज लावून कर्जही वसूल केले. या व्यवहारातून खेडेकर यांनी मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.Post a Comment

0 Comments