सांगली (प्रतिनिधी)
चंद्रकांतदादा पाटील यांनी आपला मतदारसंघ सोडून दुसर्या जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवली. एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघातून ते निवडुन आले आहेत. यात त्यांचा पुरषार्थ काय ? असा सवाल करत चंद्रकांत दादा पाटील हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशी खोचक टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेते मंडळींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील सत्ता हातातून निसटून गेल्यामुळे भाजपला फस्ट्रेशन आलंय, त्याचं उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे यातून दिसून येत आहे. सत्ता मिळविण्यासाठी सर्व मार्गाने भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचेही यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.
जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारीच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या सगळ्या प्रकारानंतर पडळकरांवर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर आज मंत्री पाटील यांनी आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.
0 Comments