Daily Mahasatta

Daily Mahasatta

विद्यार्थ्यांकडून अनावश्यक फी वसुली करू नका अन्यथा आंदोलन करू : निखिल सुतार

विटा ( मनोज देवकर ) 
चालू वर्षी शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद आहेत। त्यामधील लागली जिमखाना. इमारत निधी , एन.एस. एस. फी. हॉस्टेल फी, फंड व डेटा फी यासारख्या जे शुल्क आकारले जात आहे त्या सोई सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलाच नाही. तरी देखील ही फी संस्थेकडून वसुल करण्यात येत आहे. तरी विध्यार्थ्यांकडून अनावश्यक शुल्क घेऊ नये असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निखिल सुतार आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी , पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी शाळा कॉलेजस आहेत.. त्यामध्ये जिल्हयातील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकत आहेत चालू वर्ष २०२०-२०२१ ला जगावरती कोरोना महामारीचे संकट आले आहे . त्यामुळे सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत. त्यामुळे सर्व सर्वसामान्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे। हे प्रशासनला माहीत आहे . असे असताना देखील जिल्हयातील शाळा, कॉलेजस चे कर्मचारी विद्यार्थ्यांना या वर्षी चालू असलेल्या ऑनलाईन क्लासेस व सुरू असणान्या शाळा कॉलेज यामधून फी भरली नाही म्हणून शाळा कॉलेजमधून विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम होत आहे व काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत . त्यामुळे विद्यार्थी व पालक मानसिक तणावात आहेत तरी या फीसाठी विद्यार्थ्यांना सवलती देवून पालकांकडे या फीसाठी तगादा लावणेत येऊ नये. अशी मागणी केली आहे.

विद्याथ्यांना ऑनलाईन टिचींग मध्ये सहभागी होवू द्यावे . वसुल करण्यात येणारी फी भरणयाबद्दल पालकाची हरकत नाही. तरी परंतु चालू वर्षी शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद आहेत। त्यामधील लागली जिमखाना. इमारत निधा, एन.एस. एस. फी. हॉस्टेल ।फंड  फी यासारख्या असणाच्या ज्या फी आहत याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालाच नाही. तरी देखील ही फी संस्थेकडून वसुल करण्यात येत आहे.आमची आपणास विनंती आहे की, ज्या सुविधा सुरुच नाहीत अशा प्रकारच्या फीज संस्थेने माफ करावी व फक्त ट्युशन फी व अॅडमिशन फी विद्यार्थ्याकडून घ्यावी. त्यासाठी पालकांची हरकत नाही.

याचा निर्णय आपण सर्व जिल्हयातील संस्थाचालक व पालकमंत्र्याशी व विद्यार्थ्यांशी एक संयुक्तरित्या वैठक घेवून येणाऱ्या १० दिवसाच्या आत मार्ग काढणेत यावा अन्यथा 10 दिवसानंतर पालकांचे व विद्यार्थ्यांचे जिल्हयात मोठया प्रमाणात आंदोलन उभारु. यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील . असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनावर स्वप्नील कदम , मारुती बुरुंगुळे आणि इतर अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments