Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठी विषय शिक्षक महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी सौ. वैशाली महाडिक

विटा (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ
महाविदयालयीन महासंघाच्या वतीने विषयाची देवाण-घेवाण व भाषा संवर्धन करण्यासाठी सांगली जिल्हा तालुका निहाय कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. सुनिल डिसले व जिल्हा अध्यक्ष प्रा. दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

राज्य संघाच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी आदर्श ज्युनिअर कॉलेज विटा, येथील प्रा. सौ. वैशाली महादेव महाडीक / पवार यांची निवड झाली. व्यासंगी, विदयार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सौ. महाडीक यांनी सांगितले.

लोकनेते मा. हणमंतराव पाटील ट्रस्टचे संस्थापक व माजी आमदार अॅड. मा. सदाशिवराव (भाऊ) पाटील व संस्थेचे अध्यक्ष अॅड मा. वैभव (दादा) पाटील, कार्यकारी संचालक मा श्री. पी. टी. पाटील (साहेब) तसेच आदर्श कॉलेजचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, मुख्याध्यापक श्री. सुभाष धनवडे, ज्युनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. धनंजय कुंभार, प्रा. डॉ. मानसी जगदाळे, प्रा. डॉ. सुनिता रोकडे यांचेसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

1 Comments