Daily Mahasatta

Daily Mahasatta

जेष्ठ नागरीक हे देशाची राष्ट्रीय संपत्ती : जगन्नाथ मोरे

वाळवा (रहिम पठाण )
जेष्ठ नागरिक हे देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांना सर्वत्र सन्मानाची आणि आपुलकीची वागणुक मिळाली पाहिजे, असे मत अर्थ क्रांती व भारतीय जेष्ठ नागरीक महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनी व्यक्त केले.

अर्थ क्रांती व भारतीय जेष्ठ नागरीक महासंघ यांचे वतीने सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नागरीक मेळावा इस्लामपूर येथे पंचायत समिती बचत धाम येते संपन्न झाला मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

स्वागत चंद्रशेखर मोरे यानी केले तर प्रास्ताविक व मेळाव्याची रूपरेषा सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील सांगितली. वृद्ध नव्हे अनुभव समृध्द या स्लोगण खाली संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करुन जेष्ठ नागरीकांच्या हक्कासाठी हा महासंघ संपूर्ण महाराष्ट्र भर फिरत आहे.

नागरीकांच्या हक्कासाठी प्रमुख मागण्याही सरकारपुढे ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये जेष्ठ नागरीकांना मासिक सन्मान मानधन किमान10000/- मिळावे,
जेष्ठ नागरीकांना देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे, जेष्ठ नागरीकासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ खाते निर्माण करावे, याच माध्यमातून स्वतंत्र आर्थिक तरतूद करून सुविधा जेष्ठ नागरीकांसाठी उपलब्ध व्हाव्यात, अशा प्रमुख मागण्या आहेत.

इस्लामपूर येथील अॕड. किरण पाटील यानी विना मोबदला जेष्ठांना मदत करणार असल्याचे सांगितले तर डाॕ. स्वामी विजय कुमार यानी यानी आपले विचार मांडताना सांगितले की जेष्ठांना आपल्या हक्कासाठी लढने आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही ही खंत व्यक्त केली. तर पी के पाटील यानी प्रत्येक गावात जेष्ठ नागरीकांनी एकत्र येऊन विचार मंथन करावे जर या मागण्यांची दखल नाही घेतली तर प्रत्येक जिल्हाअधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

निवास गायकवाड यानी माहीती देताना सांगितले की वाळवा तालुक्यातील जेष्ठ नागरीकांना 14000 ओळखपत्र वाटप केले आहे. यावेळी मेळाव्यात इस्लामपूर नगरपालिकेचे नगरसेवक शहाजीबापू पाटील भेट दिली. त्यांनी सांगितले की, जेष्ठ नागरीकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहु तर मा. ना. जयंतरावजी पाटील यानाही माहीती देऊन योग्य अशी सर्व ताकद जेष्ठ नागरीकांचा पाठीमागे उभी केली जाईल.

इस्लामपूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. निशिकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रकाश हाॕस्पिटल येथे सोमवार व शुक्रवार या दिवशी जेष्ठ नागरीकांना मोफत उपचार केले जातील, असे मा. प्रविण माने यानी सांगितले.

यावेळी मेळाव्यासाठी हणमंतराव पाटील, किरण पाटील, गजानन पाटील, अनुप वाडेकर, निवास गायकवाड, भगवान पाटील, रघूराज मेटकरी, आप्पासाहेब देसाई, हिंदुराव पवार, फडणविस नाना, विजय देशमुख, प्रशांत देशपांडे, एकनाथ पवार, नारायण सावंत, आर. एन. मोहीते व जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments