Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

स्व. अरुण (भैय्या) नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुनेखेड येथे व्याख्यानमाला

वाळवा (रहिम पठाण)
स्व. अरुण (भैय्या) नायकवडी यांच्या सृतिदिनाच्या निमित्ताने सामाजिक विचारांची जपणूक करण्याच्या हेतूने जुनेखेड ता. वाळवा येथे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या विचार पुष्पाना ऐकण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आव्हान अरुण (भैय्या) नायकवडी नागरी सह. पतसंस्था मर्या; आष्टाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब निवृत्ती पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाले, गेले पंधरा वर्ष या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहोत. क्रांतीच्या विचारांचा वारसा जपताना आकस्मित भैय्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मानवंदना देऊन पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन करीत आहोत. या प्रबोधनाची ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी त्यांनी समाजबांधवाना आव्हान केले आहे.

सदरची व्याख्यानमाला 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या वर्षी सोमवार 22 रोजी श्री. रवि राजमाने (सर) जेष्ठसाहित्यिक विषय :- मी व माझ्या कथा, मंगळवार 23 रोजी प्रा.  उल्हास माळकर यांचे 'असे होते शंभूराजे ' या विषयावर तसेच 24 रोजी प्रा. श्री. आप्पासाहेब खोत यांचे 'व्यथा माणसाच्या कथाकथनाच्या ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर व्याख्यानमाला मराठी शाळेचे पटांगण, जुनेखेड ता. वाळवा येथे  सायंकाळी 7:30 वा. होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
अधिक माहीतीसाठी 
7709956665
9403402216

Post a Comment

0 Comments