Daily Mahasatta

Daily Mahasatta

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ महिन्याचे बाळ ठार, सांगली जिल्ह्यात खळबळ


इस्लामपूर(हैबत पाटील) : तडवळे (ता. शिराळा ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या नऊ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सोमवार ता. १२ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या थरारक आणि भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचे सावट आहे.


    याबाबत अधिक माहिती अशी तडवळे (ता .शिराळा ) येथे जाईच्या विहिरी जवळ बंडा शामराव पाटील यांच्या शेतात ऊस तोड चालू होती. ऊस तोडण्यासाठी बीड कडील ऊस तोड मजूर आले होते. बाजूला असणाऱ्या झाडाखाली सावलीत या नऊ महिन्याच्या बाळाला झोपवले होते. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बाजूलाच असणाऱ्या ओढ्याच्या दिशेने येऊन बाळाच्या दिशेने झेप घेतली. त्याला जबड्यात पकडून धाव घेतली. ही गोष्ट अन्य मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्याला घाबरून बिबट्याने बाळाला टाकून पलायन केले. ताबडतोब त्या जखमी बाळास उचरासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र रस्त्यातच त्याची प्राणजोत मालवली.

    गेल्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने मुलांच्यावर हल्ला केला होता .एका मुलावर पाठीमागून हल्ला केला पंज्या मारल्याने ने त्याची कपडे फाटली होती. त्यांनी त्यावेळी आरडा ओरड केल्याने त्याने धूम ठोकली होती. लहान मुलांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिराळा अन वाळवा तालुक्यात बिबट्याची चांगलीच दहशत आहे .ग्रामीण भागात लोक शेतात जाण्यास घाबरु लागलेत. या घटनास्थळावर वन अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली आहे

Post a Comment

0 Comments