Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवप्रताप पतसंस्थेमुळे ' विटा - इचलकरंजी ' नाते घट्ट होईल : राहुल आवाडे

इचलकरंजी : येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ करताना युवा नेते राहुल आवाडे. यावेळी संस्थापक चेअरमन प्रतापशेठ साळुंखे, व्हाईस चेअरमन हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे व अन्य

इचलकरंजी ( प्रतिनिधी)
विटा आणि इचलकरंजी शहराचे नाते अतूट आहे. सोने - चांदी गलाई काम आणि यंत्रमाग व्यवसाय हा दोन्ही शहरांना जोडणारा पूल आहे. आता शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचा इचलकरंजी शहरात प्रवेश झाल्याने हे नाते आणखी घट्ट होईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य युवा नेते राहुल आवाडे यांनी व्यक्त केला आहे.

विटा येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेच्या १४ व्या शाखेचा शुभारंभ इचलकरंजी येथे जि. प. सदस्य राहुल आवडे यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे, व्हाईस चेअरमन हणमंतराव सपकाळ, महाराष्ट्र् प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मदानराव कारंडे, कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे म्हणाले, संस्था चालवत असताना विश्वस्थ म्हणून आम्ही संचालक मंडळ पंचसूत्रीचे अवलंब करत असतो. आम्ही साखर कारखाने व सूत गिरण्याना कर्ज देत नाही. राजकीय व्यक्तीना कर्ज देत नाही. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना कर्ज देत नाही. सोने तारण कर्ज अल्प व्याज दरात, अल्प वेळेत ,अल्प खर्चात उपलब्ध करून देत आहोत. उत्पादक बाबींना कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून शिवप्रताप संस्थेची ओळख निर्माण झाली आहे.

यावेळी पांडुरंग मुळीक, नगरसेवक अमरजित जाधव, हुपरी ज्वेलर्सचे सावकार शिराळे, अॅड. डी. डी. जाधव, माजी नगरसेवक जाधव ,पी. एन. जी. ज्वेलर्सचे मॅनेजर व त्यांचा सर्व स्टाफ व हुपरी येथील चांदी गलाई व्यवसायिक यांनी भेटी दिल्या. त्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, व्हाईस चेअरमन हणमंतराव सपकाळ व संचालक यांनी स्वागत केले. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन सौ. अर्चना व श्री. सुभाषराव कदम यांचे हस्ते पार पडला. आभार शाखाधिकारी विश्वजित पाटील यांनी मानले
--------------------------------
संस्थेची उलाढाल
२५० कोटींची...
शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी पतसंस्थेच्या ठेवी १५० कोटींच्या तर कर्ज वितरण १११ कोटींचे आहे. एकूण उलाढाल २५० कोटींची असून संस्थेला सतत ऑडिट वर्ग' अ' आहे. संस्थेस आता पर्यंत १६ आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत. आगामी काळात देखील संस्था अशीच प्रगती पथावर राहील.

- विठ्ठल साळुंखे
कार्यकारी संचालक.

Post a Comment

0 Comments