Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा बाजार समितीच्या सभापतीपदी बापूराव शिंदे यांची बिनविरोध निवड

विटा ( मनोज देवकर )
विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापतीपदी बापूराव जयसिंग शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे मावळते सभापती चंद्रकांत चव्हाण, उपसभापती प्रभाकर आलेकरी, माजी सभापती आनंदराव (काका) पाटील, माजी उपसभापती राजेश कदम व सर्व संचालक उपस्थित होते.

नवीन सभापती बापूराव शिंदे यांचा सत्कार सुहास बाबर यांचे हस्ते करण्यात आला. सदर निवडीचे कार्यक्रमावेळी ढवळेश्वर चे विक्रम अण्णा शिंदे, बेनापुर चे राजाभाऊ शिंदे, भाळवणी चे महेश घोरपडे, बेनापुर चे अनिल (साहेब) शिंदे, वाझरचे संजय (बापू) जाधव, पंचायत समिती विटा चे माजी सदस्य पांडुरंग डोंगरे, शिवसेनेचे विटा शहराध्यक्ष राजू जाधव, समीर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज (भैय्या) शेख, ढवळेश्वर चे उपसरपंच दिलीप (अण्णा) किर्दत, भाजीपाला व्यापारी अनिल हराळे, रणजीत कदम, जखिनवाडी गावचे ग्रामस्थ तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments