Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्याच्या चौकात गलाई बांधवांच्या सन्मानार्थ स्टॅच्यू बसवा : प्रहारची मागणी

विटा ( मनोज देवकर )
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेनिम्मित विटा नगरपालिकेची जोरदार तयारी सुरू आहे. शहर सुशोभित करण्याच्या दृष्टीने शहरात विविध प्रकारची शिल्पं चौकाचौकात बसवण्यात येत आहेत. मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात गलाई बांधवांच्या सन्मानार्थ शिल्प बसवण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताकुमार खंडागळे यांनी नगरपालिकेकडे केली आहे.

विटा शहर गलाई बांधवांनी दिलेल्या योगदानामुळे "सुवर्णनगरी" म्हणून ओळखले जाते. देशभरात जाऊन सोने चांदी शुद्ध करण्याचा गलाई व्यवसाय इथल्या लोकांनी केला. जरी बाहेर गेले तरी गलाई बांधवांनी इथल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सामाजिक कार्यात हे व्यावसायिक अग्रेसर असतात. त्यांच्या योगदानामुळे परिसरातील अर्थकारणाला चालना मिळाली आहे. त्यांच्या सन्मानार्थ मुख्य चौकात सोने गाळण्याची मुस, भट्टीवर काम करणारा गलाई बांधव असे शिल्प बसवण्यात यावे अशी मागणी प्रहार चे संपर्क प्रमुख आणि पत्रकार दत्ताकुमार खंडागळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments