Daily Mahasatta

Daily Mahasatta

अनिलभाऊंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाची घोडदौड : सुहास बाबर

घानवड : येथे 25/15 योजनेमधून अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व अन्य.

विटा ( मनोज देवकर )
मतदारसंघात मतदारांनी सांगितलेल्या सर्व कामांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. मतदारसंघ विकासाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. ते घानवड येथे 25/15 अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी बाबर म्हणाले की मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही . गावातील लोकांनी अजूनही विकासाच्या दृष्टीने कामे सुचवावीत. गावासाठी मागाल ते काम देऊन तुमच्या संकल्पनेतील गाव आमदार अनिलभाऊंच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून पूर्ण केले जाईल. शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे काम अनिलभाऊंच्या अथक प्रयत्नानेच झाले आहे .मागील दोन निवडणुकीत आमदार अनिलभाऊंनी या मतदारसंघाच्या विकासाचा व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्याचा जो शब्द दिला होता तो पूर्ण केल्याचे समाधान निश्चितच या मतदारसंघातील प्रत्येक जण बोलून दाखवत आहे .जो विश्वास2014 आणि 2019 साली आम्हा बाबर कुटुंबियांवर दाखवला तो इथुन पुढील काळातही आमच्या सोबत असावा. आमदार अनिलभाऊ व मी तुमच्या गावच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असेही यावेळी सुहास बाबर यांनी सांगितले .

यावेळी प्रशांत भोसले , कृष्णा रावताळे, मनोहर रावताळे, दिलीप कदम, शिवाजी सावंत, उद्धव रावताळे,नारायण सावंत,बबन रावताळे,दशरथ भोसले,संतोष सावंत,चंद्रकांत जाधव,बापूराव चव्हाण,प्रभाकर सावंत,रामचंद्र रावताळे,भिवाजी कदम,पांडुरंग रावताळे,शिवाजी रावताळे,अशोक सावंत,हणमंत रावताळे,प्रभाकर सावंत,नवनाथ सावंत आदी ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments