Daily Mahasatta

Daily Mahasatta

बेकायदेशीर शस्त्र बाळगले, सांगलीतील दोघांना अटक

जत, (सोमनिंग कोळी)
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या सांगली येथील दोन गुंडांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजयनगर, सांगली येथील गुंड तुकाराम सुभाष मोटे रा. संजयनगर, सांगली (वय-२५) व वैभव बाजीराव मलमे, रा. माधवनगर,सांगली हे दोघे बिरनाळ गावाच्या हद्दीतील निसर्ग हॉटेल समोर शस्त्र विकण्यासाठी शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता आले असल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक केरबा चव्हाण, प्रवीण पाटील, सचिन जवंजाळ , बजरंग थोरात, समाधान पाटोळे, आदटराव मासाळ यांनी सापळा रचून त्या दोघांना सातारा रोड परिसरात ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पाच कोयते, एक कुकरी,व हिरो-होंडा कंपनीची स्पेलेंडर दुचाकी गाडी(MH-10-DA-7797) ताब्यात घेतली. या दोघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद केरबा चव्हाण यांनी दिली आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments