Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्याच्या गव्हर्नर पदी बसलेली व्यक्ती विक्षिप्त : मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका

जत ( सोमनिंग कोळी)
राज्याच्या गव्हर्नर पदी बसलेल्या विक्षिप्त माणसांमुळे अडचणी येत आहे, अशी घणाघात टीका महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली आहे. जतमधील आ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेल्या माळरान कृषी प्रदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यपालांवर कठोर शब्दांत टीका केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर ,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उपस्थिती लावली होती आणि या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणी वरून बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा हवाला देत, दादांनी मला संगीतले आहे एक विक्षिप्त असा माणूस राज्याच्या गव्हर्नर पदी बसला आहे, तसेच मीडियावाल्यांना दाखवयाचे , पण आपण संविधानाने जोडले गेलो आहे, आणि संविधानावर प्रश्न निर्माण करून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार माणूस राज्यपाल म्हणून बसले आहेत. याठिकाणी कृषी विद्यालय निर्माण करण्यासाठी ते अडचणी आणत आहेत,असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्यावर केला आहे.

नाम. दादा भुसे म्हणाले, विश्वजीत कदम व आ. सावंत माझ्याकडे सतत येत असतात जतच्या शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न आ. सावंत मांडत असतात वास्तविक माझाही निम्मा तालुका जत सारखाच आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके मी जाणून आहे. त्यामुळे या तालुक्याला कृषी विभागाचा निधी देताना माझा मतदारसंघ समजून देण्यात येईल. पाण्याच्या बाबतीत आम्ही सर्व मंडळी सोबत आहे. मुख्यमंत्र्यांना बोलून येत्या चार वर्षात इथली योजना मार्गी लावण्याचे काम केले जाईल.

मंत्री विश्वजित कदम यांनी जतच्या दुष्काळाचा संघर्ष सांगताना, इथे आज विक्रम दादांना राजकीय संघर्ष मोठा करावा लागतो. आमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्ही सगळे एक दिलाने आहोत. परंतु इथे जरा वेगळेच असते. विक्रम दादा म्हटले की कोण कुणाशी हातमिळवणी करेल हे सांगता येत नाही , असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.
--------------------------
दुष्काळी जतला पाणी : आ. विक्रमदादा सावंत

विक्रमदादा सावंत म्हणाले, जतला म्हैसाळ योजनेचे पाणी येण्यास 40 वर्षे गेली. आता कुठे 20 टक्के भाग सिंचनाखाली आला आहे. अजून 80 टक्के भाग कोरडा आहे. या भागाला पाणी मिळावे, म्हणून सतत आमचा संघर्ष सुरू आहे. आम्ही प्रस्तावित केलेली तुबची योजना आहे ती फिजीबल असल्याचे सिद्ध झाले आहे. यातून किमान पावसाळ्यात तरी तलाव भरून देण्यासंदर्भात कायदेशीर पूर्तता व्हावी ही मागणी आहे.

Post a Comment

0 Comments