Daily Mahasatta

Daily Mahasatta

जिल्हा बँकेचे अधिकारी प्रभाकर कोळी यांना प्रतिष्ठारत्न पुरस्कार जाहीर

जत ( सोमनिंग कोळी)
तासगांव तालुक्यातील चिंचणी येथील प्रतिष्ठा फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठारत्न पुरस्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली विभाग प्रमुख अधिकारी प्रभाकर आणू कोळी यांना जाहीर झाला आहे. ही घोषणा प्रतिष्ठा फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांनी केली आहे.

हा पुरस्कार दि. २७ फेब्रुवारी रोजी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व रोहितदादा पवार, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, सांगली कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पाटबंधारे अभियंता लालासाहेब मोरे व रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगांव येथील सम्रुध्दी मल्टीपर्पज हॉल येथे प्रदान करण्यात येणार आहे.

प्रभाकर कोळी मनमिळावू स्वभावाचे एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली विभाग प्रमुख म्हणून काम पहात आहेत. शालेय जीवनातच त्यांना 'आदर्श विद्यार्थी' पुरस्काराने सन्मानाची थाप पडली त्यानंतर त्यांनी मागे पहिलच नाही. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

2001 साली सांगली जिल्हा मध्यवर्ती अमृतमहोत्सवी आदर्श क्लार्क पुरस्कार, तर 2016 मध्ये श्री. गुलाबराव पाटील सहकार मधून 'उत्कृष्ट अधिकारी' पुरस्कार तसेच त्यांनी श्री. सिद्धीकला भजनी मंडळ ट्रस्ट च्या सेवा प्रमुख म्हणून गेले अनेक वर्षे काम करत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी जत तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता दहावी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व अनेक सामाजिक त्यांनी राबवित असतात.आणि 2019 मध्ये कै.बापुरावजी देशमुख 'उत्कृष्ट सहकारी बँक अधिकारी' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments