Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात दोन्ही चावड्यांच्या नावानं ' बोंब ' ठोकत शिवसेनेचे अनोखे आंदोलन

इस्लामपूर : शिवसेनेचे शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

इस्लामपूर (हैबत पाटील)
इस्लामपूर शहर शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर शंख ध्वनी करत तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. महसूल प्रशासनाचा धिक्कार असो, मस्तवाल तलाठ्याची हकालपट्टी झालीच पाहिजे, संगणकीय सातबारा वरील चूका दुरुस्त्या झाल्या पाहिजेत अशा घोषणा देत आज शिवसेना शहर च्या वतीने शंखध्वनी करत निषेध केला.

शकील सय्यद यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याशी चर्चा करताना गेल्या आठ दिवसात चावडीच्या खेळ खंडोबा बाबत काय उपाय योजना केली. इस्लामपूर चावडीला 15 दिवस कुलूप का आहे ? याचा लेखी खुलासा आजच द्यावा अशी मागणी केली. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

यावेळी तहसीलदार यांनी येत्या पंधरा दिवसात प्रलंबित नोंदी घातल्या जातील. शहरातील दोन्ही चवड्यांची दप्तरे तपासणी केली आहे. त्याचा अहवाल वरीष्टांना दिला जाईल. त्याचबरोबर निवेदनात ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन तहसीलदार सबनीस यांनी दिले असल्याचे शिवसेनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी शकील सय्यद , प्रदीप लोहार, राजेंद्र पवार, संदीप पवार, गुलाब मुल्ला , यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments