Daily Mahasatta

Daily Mahasatta

भिलवडीच्या सरपंच पदी सविता महिंद - पाटील , तर उपसरपंच पदी पृथ्वीराज पाटील

भिलवडी ( खंडेराव मोरे)
भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सविता महिंद पाटील यांची तर उपसरपंच पदी पृथ्वीराज पाटील यांची निवडकरण्यात आली आहे. या निवडीनंतर नुतन सरपंच, उपसरपंच यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला.

गेल्या काही दिवसांपासून भिलवडी सरपंच आणि उपसरपंच पदाची संधी कोणाला मिळणार ? ह्या चर्चेला भिलवडी आणि भिलवडी परिसरामध्ये उधाण आले होते. मात्र अखेर सत्ता स्थापनेसाठी  भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पद हे सर्वसाधारण महिले साठी राखीव जागा मिळाली. त्यानंतर परिसरामध्ये वेग वेगळ्या चर्चांना उधाण येऊ लागले होते. मात्र अखेर सविता बाळासो महिंद-पाटील यांची भिलवडी गावचे सरपंच पदी वर्णी लागली आहे. तर खंडोबा ग्राम विकास पँनेलचे प्रमुख व भिलवडी गावचे नेते यशवंतराव उर्फ राजु दादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांनी घरचा उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना उपसरपंच पदाची संधी देऊन राजकिय सत्तेचा समतोल साधला आहे.नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांना विविध मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत . निवडी प्रसंगी बाळासाहेब मोहिते, विलास पाटील, मोहन तावदर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, पधाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments