Daily Mahasatta

Daily Mahasatta

चांदोली राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा शुभारंभ

चांदोली ( नथुराम कुंभार)
चांदोली राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणार्‍या उखळू ते उदगिरी या जंगल सफारीचा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

वारणावती( ता. शिराळा) येथील वन्यजीव कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमावेळी जलसंपदामंत्री मा. ना. जयतराव पाटील व आमदार -मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शक फलकाचे अनावरण व प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १६ गाड्यांचे उद्घाटन केले. या नवीन मार्गासह झोळंबी पर्यंतचा एक मार्ग आहे. या दोन्हीं पैकी कोणत्याही एका मार्गावर जाण्यासाठी पर्यटकांना चांदोली वन्यजीव विभागाकडून रीतसर त्यासाठीचे शुल्क भरून परवानगी घेवुन प्रवास करता येणार आहे. पर्यटनास चालना देण्यासाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या या मार्गामुळे चांदोलीपासुन उखळु ते उदगीरीपर्यत पर्यटकांना जंगल सफरीचा आंनंद लुटता येणार आहे तसेच यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वनसंरक्षक समाधान चव्हाण, उप वनसंरक्षक प्रमोद धानके, साहाय्य वनसंरक्षक बी. एस. घाडगे, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप अभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, सरपंच वसंत पाटील, मोहन पाटील, राजू वडम, सरपंच राजू मुटल, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वाडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments