Daily Mahasatta

Daily Mahasatta

महावितरणच्या भोंगळ कारभाराकडे कोण लक्ष देणार ?

पलुस (अमर मुल्ला)
पलूस तालुक्यातील वीज वितरण विभाग म्हणजे एक सावळा गोंधळ आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं नाही. लॉकडाऊनच्या काळात व्यापारी वर्गाची दुकाने तीन चार महिने बंद अवस्थेत होती. त्यावेळी वीज वापरली नसताना ही , महावितरणकडून बेसुमार रक्कम असलेली वीज बिले महावितरण कार्यालयातून दिली गेली आहेत .

काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले होते , की वीज बिल भरू नका , लॉक डाऊन कालावधीत वीज बिले माफ करण्यात यावित, अशा स्वरूपात मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य नागरिकांनी आपली वीज बिले भरली नाहीत. त्यामुळे भरमसाठ वीज बिले महावितरण कडून नागरिकांना मिळत आहेत.

थकबाकी, दंड, व्याज याची सुद्धा वाढ या बिलामध्ये करण्यात आलेली आहे. वीज बिले भरणाऱ्यांची वाढीव बिले थकबाकी दाखवून आलेली आहेत. काहींचे कनेक्शन कट केलेले असताना ही आधीचे बिल भरले नाही म्हणून दुप्पट आकारणी करून त्यांना बिले देण्यात आली आहेत. कोणीच याची गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही असं चित्र पलूस तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे .

महावितरण कडून थकबाकी असणाऱ्यांची कनेक्शन तोडली जात आहेत , या सर्व प्रकाराकडे राज्य सरकार लक्ष द्यायला तयार नाही .सर्व नागरिक आणि सामाजिक संघटनांनी यावर आवाज उठवून महावितरण करत असलेल्या चुकीच्या कारवाईला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे
------------------------------------

मागील जुनी बिले दाखवा...
ग्राहकांनी वाढीव बिलासंदर्भात विचारणा केली असता, महावितरण कर्मचाऱ्यांकडून जुन्या बिलांची मागणी होते. कॅम्पुटर सिस्टीम असताना सुद्धा ग्राहकांची हेळसांड करण्याचे काम महावितरण कर्मचारी करत आहेत, ही त्रासदायक वागणूक थांबवावी.
सामाजिक कार्यकर्ते सदामते सर

Post a Comment

0 Comments