Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवप्रताप मल्टिस्टेट कराड शहरात उत्तम प्रगती करेल: नगराध्यक्षा रोहिणी शिंदे

कराड (प्रतिनिधी)
कराड शहर बँकिंग व्यवसायास धार्जिणे आहे. सर्व संस्था चांगल्या चालतात. शिवप्रताप चा कारभार व प्रगती पाहता संस्थेला खूप मोठे भवितव्य आहे. त्यामुळे विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्था कराड शहरात उत्तम प्रगती करेल, असा विश्वास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केला.

विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेचे कराड शाखेचे उदघाटन प्रसिद्ध धनवंतरी डॉ. अनिल शहा , नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मा. रघुनाथ (काका) कदम, भा ज पा चे पक्ष प्रतोद विनायक पावसकर, यांचे हस्ते पार पडले. यावेळी रोहिणी शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी कार्यकारी संचालक श्री. विठ्ठलराव साळुंखे
यांनी संस्थेचा लेखा जोखा मांडला. संस्थेची एकूण उलाढाल 260 कोटींची असून 150 कोटींच्या ठेवी व 111 कोटींची कर्जे आहेत. सतत ऑडिट वर्ग अ
16 आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत. एन पी ए 0 % असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांनी संस्थेच्या धोरणाची पंचसूत्री सांगितली.

चेअरमन प्रतापशेठ साळुंखे म्हणाले, आमची संस्था साखर कारखाना, सुतगिरण्यांना कर्ज देत नाही. संस्था राजकारणी लोकांना कर्ज देत नाही. त्याबरोबर पै पाहुण्यांना कर्ज देत नाही. केवळ प्रामुख्याने सोने तारण अथवा उत्पादक गोष्टीलाच कर्ज दिले जाते. त्यामुळे एन पी ए 0% करू शकलो आहे. जनतेच्या पैशाचा विश्वस्थ या नात्याने योग्य विनियोग करून विश्वास संपादन केला आहे. कराड शहरात सुद्धा विश्वासपूर्वक वातावरण करून गरजूना कर्ज पुरवठा करू. सोने तारण कर्जास व्याजदर कमी असून अतिशय सुलभ आणि कमी वेळेत कर्ज पुरवठा केला जातो, अशी माहिती अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे यांनी दिली.

यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन सौ व श्री. प्रवीण थोरात यांचे शुभ हस्ते पार पडले. सदर वेळी किसनराव पाटील, डॉ. श्री. वसंतराव देवकर,सौ. सविता देवकर, डॉ. नितीन जाधव,डॉ. सतीश शिंदे, शामसुंदर तवटे, बाजीराव पाटील,प्रदीप शिंदे, स्वप्नील राऊत,जगदीश इंगवले, रमेश घाडगे, भुपेंद्र मेहता,बाबा जगदाळे, ऍड. विकास पवार, (अध्यक्ष सातारा जिल्हा म न से), स्वाती पिसाळ (सदस्य भाजप प्रदेश कार्यकारिणी) संस्थेचे व्हाईस चेअरमन हणमंतराव सपकाळ, संचालक सिताराम हरुगडे, आलम पटेल, सुरेखाताई जाधव व जनरल मॅनेजर धोंडीराम जाधव, प्रशासकीय अधिकारी सिकंदर शेख, सोनेतारण विभाग प्रमुख सुजाता भिसे, शशिकांत कुलकर्णी सभासद ग्राहक कर्मचारी हजर होते

Post a Comment

0 Comments