Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडी नऊ फेब्रुवारीला

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
तालुक्यातील माहुली , नागेवाडी , पारे , मंगरूळ , खंबाळे भा , तांदळगाव , भिकवडी बु , देविखिंडी , रेणावी , पोसेवाडी , भडकेवाडी, शेंडगेवाडी , मेंगाणवाडी या ग्रामपंचायतीत या निवडी होणार आहेत.

या तेरा पैकी सात ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच होणार आहेत. माहुली , नागेवाडी आणि भडकेवाडी येथे सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुले असणार आहे. तर पारे , खंबाळे , देवीखिंडी आणि शेंडगेवाडी येथील सरपंच पद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित आहे. मंगरूळ , भिकवडी , रेणावी येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

पोसेवाडी आणि मेंगाणवाडी येथील सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षीत असून मेंगाणवाडीत सदर प्रवर्गातील सदस्य नसल्याने जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तांदळगाव येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी आरक्षीत आहे.

Post a Comment

0 Comments