Daily Mahasatta

Daily Mahasatta

नकली पिस्तुल दाखवून लुटले, सहाजणांची टोळी जेरबंदसांगली (प्रतिनिधी)
बनावट पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून अल्टो गाडीतून अपहरण करत सोन्याची चेन आणि अंगठी चोरणार्या सहाजणांच्या टोळीला सांगली गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी तुर्ची कारखाना तासगाव ते विटा शहर हद्दीत घडली होती. या प्रकरणात तासगाव, आटपाडीसह पुण्यातील आरोपीचा समावेश आहे.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी ११ फेब्रुवारी रोजी विशाल चव्हाण (रा. पुणदी ता. तासगांव) व त्यांचे मित्र नितीन बाबासो पाटील (रा. पुणदी) हे त्यांचे पलुस येथील नातेवाईकाकडुन जेवण करून त्यांचे गांवी पुणदी कडे रात्रौ ८ : ३० वा चे सुमारास त्यांचे मारूती सुझूकी अल्टो गाडीतुन तुर्ची कारखाना ते तासगांव कडे जात होते. यावेळी  विशाल यांच्या गाडीचे पाठीमागुन युनीकॉर्न मोटरसायकल वरून आलेल्या  ३ इसमांनी  गाडी आडवी मारून अल्टो थांबवली.  त्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यास शिवीगाळ करुन त्यांचेकडे असणारे पिस्टल सारखे दिसणारे शस्र  व चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी व साक्षीदार यांना जबरदस्तीने पुढील सिटवरून पाठीमागील सिटवर बसवुन त्यांचे डोळयावर मफलर बांधला. फिर्यादीचे मित्र नितीन पाटील यांला हाताने मारहाण करुन त्याचे अंगावरील सोन्याची चेन व अंगठी जबरस्तीने काढुन घेत गाडी वेगाने विटा शहराकडे घेऊन गेले.

विटा शहराजवळ गेल्यानंतर अल्टो गाडीचा वेग कमी झाल्यानंतर नितीन पाटील यांने चालत्या वाहनातून उडी घेतली. यामध्ये ते जखमी झाले होते. त्यानंतर संशयित आरोपी वाहन सोडून पळून गेले होते. याबाबत तासगाव पोलीसात गुन्हा दाखल आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला होता.

अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी एक स्वतंत्र तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेलमधुन सुटलेले आरोपी यांचा शोध घेत असताना  २३ फेब्रुवारी  रोजी सदरचा गुन्हा केलेले इसम हे सराफ कट्टा सांगली येथे गुन्हयातील मुद्देमाल विक्री करीता येणार असल्याची माहीती मिळाल्याने तेथे पाळत ठेवुन छापा मारत दोन मोटर सायकल  वरील ट्रिपल सिट सहा संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांची नावे  १) बालाजी निवास पाटील (वय. २६ रा. पुणदी, ता. तासगांव)  २) राजेंद्र धनाजी चव्हाण (वय. २७ रा. पिंपरी ता. आटपाडी ) ३) धनंजय महेश साळुंखे (वय. २४ रा. पर्वती , जि. पुणे ) ४)कुनाल तानाजी ऐवळे (वय. २१ रा. पर्वती पुणे)  ५ ) शितल विश्वनाथ जाधव (वय. २७ रा. ढवळवेस, तासगांव)  ६)श्रीकृष्ण अंकुश माळी (वय. १९ रा. वरचेगल्ली, तासगांव)  यांना ताब्यात घेतले त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्याची चैन व अंगठी मिळून आली.

त्याबाबत  त्यांनी तुर्ची फाटा येथे अल्टो गाडीवरती पाळत ठेवुन संबंधिताकडून सोन्याची चैन व अंगठी चोरल्याचे कबूल केले. त्यावेळी त्यांचे कब्जातुन १ लाख ६१ हजार ६०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला व पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करणेत आले.सदर प्रकरणातील आरोपी राजेंद्र धनाजी चव्हाण रा. पर्वती पुणे याचेवर पुणे येथे यापुर्वी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

 

Post a Comment

0 Comments