Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनीता माने, उपसरपंचपदी सचिन बोराडे

जत (सोमनिंग कोळी) 
 जत तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनीता महादेव माने यांची तर उपसरपंचपदी सचिन हनुमंत बोराडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. एकूण १३ पैकी १३ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी मंडळ अधिकारी भारत काळे यांनी  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तलाठी अनिल हिप्परकर, ग्रामसेविका कल्पना गवळी , लिपिक सुभाष निकम उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे  सत्कार करण्यात आले. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. हौसाबाई तुळशीराम नलवडे,दत्तात्रय व्हनमाने,कृष्णदेव बुरुटे, विष्णु शिंदे,शिवाजी माने,सतीश नाईक,सौ. शीतल भारत व्हनमाने, सौ. काजल संजय बुरुटे, सौ. स्वाती काका सावंत, पूनम जावेद मुजावर , सौ. वर्षाराणी साहेबराव शिंदे यांच्यासह १३ सदस्य उपस्थित होते.

माजी सरपंच संभाजी पाटील यांनी स्वागत केले. सत्कार कार्यक्रमात माजी सरपंच लक्ष्मणराव बोराडे म्हणाले की,शेगावच्या जनतेने गावात विकास कामासाठी व शांततेसाठी भाजप-राष्ट्रवादीच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला भरघोस मते देऊन एकूण १३ पैकी १२ उमेदवार विजयी केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच संभाजी पाटील,युवा नेते दादा पाटील,वसंत शिंदे,वसंत काशीद, बबलू शिंदे, मल्लिकार्जुन नाईक, केशव निकम, युवा नेते दिगंबर निकम, राजू नाईक, पांडुरंग सोलनकर, माजी सैनिक दादा बोराडे, तानाजी मुळे, भारत व्हनमाणे, समाधान सावंत, महादेव तेली, केशव निकम, जावेद मुजावर, धनाजी माने आदी उपस्थित होते.
-----------------------------
सर्वांना बरोबर घेऊन
गावचा विकास करु


शेगावच्या जनतेने आमच्या पॅनेलला भरभरुन मते देऊन आमच्यावर मोठा विश्वास व जबाबदारी सुद्धा दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास गतीने करू.

सचिन बोराडे ,
उपसरपंच, शेगाव ग्रामपंचायत.
 

--------------------------------------------------------

भिलवडीच्या सरपंच पदी सविता महिंद - पाटील

अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Post a Comment

0 Comments