Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत पुर्णतः तुटलेल्या हाताचे प्लास्टिक सर्जरीने यशस्वी पुनर्रोपण : डॉ. अविनाश पाटील

सांगली (प्रतिनिधी)
पलूस तालुक्यातील शिवाजी पवार यांचा मनगटातून पूर्णपणे तुटलेल्या हाताचे प्लास्टिक सर्जरीने यशस्वी पुर्नरोपण करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. अविनाश पाटील यांनी दिली आहे.

डाॅ. अविनाश पाटील म्हणाले, जानेवारी २०२१ रोजी जाधववाडी, देवराष्ट्रे ता. पलूस येथील श्री. शिवाजी धोंडीराम पवार (वय ५५ वर्षे) यांचा डाव हात मनगटाच्या वरती ५ ईंचावर, जमिनीच्या वादातून सख्या भावाने कोयत्याने वर करून पूर्णपणे तोडला होता. हि घटना सकाळी ११ वाजता घडल्यानंतर पवार यांना सांगलीला सुश्रुत प्लास्टिक सर्जरी व बर्नस हॉस्पिटल येथे पोहोचण्यास दुपारचे २.१५ वाजले होते. हात पूर्णपणे तुटल्यामुळे, सर्व रक्तवाहिन्या, स्नायू, मेंदूच्या शिरा (नर्व्ह ) दोन्ही हाडे यातून खूप प्रमाणात रक्तस्राव झालेने पवार शॉकमध्ये होते. तसेच त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. या आकस्मित दुर्घटनेमध्ये त्यांना वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन देऊन, तीन बाटली रक्त तातडीने देण्यात आले.

इमर्जन्सी ऑपरेशन करणे गरजेचे होते. कारण सहा तासाच्या आत रक्तवाहिन्या जोडल्या गेल्या नाहीत
तर पुढचा तुटलेला हात निर्जीव होऊ शकतो. त्यामुळे डॉ. अविनाश पाटील, भूलतज्ञ डॉ. सुरेश पाटील आणि ऑपरेशन थियेटरच्या सर्व परीचाराकानी तातडीने पेशंटला ऑपरेशनसाठी घेतले. भूल देऊन पूर्ण तयारी झाल्यानंतर प्रथम दोन्ही हाडे नेलच्या सहाय्याने जोडल्यानंतर हाडाच्या जवळचे स्रायू जोडण्यात आले. त्यानंतर दोन्ही रोहीणी आणि दोन निला जोडण्यात आल्या. रक्तवाहिन्या मायाक्रोसर्जरी सहाय्याने जोडल्यानंतर पूर्णपणे तुटलेल्या हातातून रक्तपुरवठा सुरु झाला. त्यानंतर तुटलेल्या मेंदूच्या शिरा ( मज्जातंतू ) आणि वरच्या बाजूचे स्रायू जोडण्यात आले. त्यानंतर त्वचेला टाके घालून पूर्णपणे तुटलेल्या हाताचे पुर्नरोपण यशस्वी करण्यात आले.

या शस्त्रक्रियेला सहा तास लागले. यानंतर रुग्णास प्रतीजैविके आणि वेदनाशामक इंजेक्शन, सोबत रक्ताचा पुरवठा करणारी आणि जिथे रत्तवाहिन्या जोडल्या त्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन रक्तपुरवठा बंद होऊ नये म्हणून रक्त न गोठन्यासाठी इंजेक्शन दिली गेले. अशारितीने या गंभीर दुखापतीमुळे जो हात काढून टाकावा लागला असता तो प्लास्टिक सर्जरी आणि मायाक्रोसर्जरीच्या अद्ययावत शस्त्रक्रियेतील तंत्राने यशस्वी पुनर्रोपण करून जिवंत राहिला आणि श्री पवार हे अपंग होण्यापासून वाचले.

यावेळी डॉ. अविनाश पाटील यांनी सर्वाना विनंती केली आहे कि दुर्दैवाने असा जर अवयव तुटला तर सहा तासाच्या आत रक्तवाहिन्या जोडल्या जातील अशा तातडीने रुग्णांस हॉस्पिटलमध्ये हलवावे. तसेच तुटलेला अवयव पूर्णपणे तुटला असेल तर तो प्लास्टिकच्या पिशवी अथवा भांड्यामध्ये ठेवावा आणि सभोवती बर्फ ठेवावा. परंतु तुटलेला भागाशी पाण्याचा संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण तुटलेल्या रक्तवाहिन्यामधून केशाकर्षनाने पाणी आत जाऊन रक्तवाहिनी खराब होते.

जर एखादा अवयव भांडणामध्ये तुटला असेल तर पोलिस स्टेशनला नोंद करण्यासाठी बरेचजन सुरवातीचा महत्वाचा वेळ वाया घालवतात आणि जर खूप वेळ यासाठी खर्च झाला तर अवयवांचे पुर्नरोपण अवघड होते. अशाप्रकारची पोलीस नोंद किंवा पोलीस साक्ष शस्त्रक्रिये नंतरही करता येते, अशी माहिती डाॅ अविनाश पाटील यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments