Daily Mahasatta

Daily Mahasatta

सोनहिरा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष : आम. मोहनराव कदम .

 कडेगाव, ( सचिन मोहिते )
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२० - २१ मधील मा. जिल्हाधिकारीसो,सांगली यांचे आदेशानुसार गठीत केलेले भरारी पथकप्रमुख मा. सौ. डॉ. शैलजा पाटील-तहसिलदार, कडेगांव, आणि एस. व्ही. कोल्हापूरे-व्दितीय विशेष लेखापरिक्षक, सह. संस्था सांगली, जी. ए. तांदळे -पोलीस कॉन्स्टेबल चिंचणी-वांगी, शेतकरी तानाजी नाजू जगदाळे, संभाजी विष्णू जगदाळे अंबक यांचे उपस्थितीत आणि शेती अधिकारी-प्रशांत कणसे, चिफ इंजिनिअर -सयाजी पाटील, इ. डी. पी. मॅनेजर-पांडुरंग निकम, स्टोअर किपर-दिलीप जाधव, केनयार्ड सुपरवायझर - शिवाजी सुर्यवंशी यांचे समक्ष वजनकाट्याची तपासणी केली असता वजनकाटा निर्दोष असलेचा तपासणी अहवाल कारखाना प्रशासनाकडे सादर केला. अशी माहिती कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कारखान्याचे चेअरमन मा.आ .वनश्री. मोहनराव कदम यांनी दिली.

यावेळी बोलताना चेअरमन मा. आ. वनश्री. मोहनराव कदम म्हणाले की, आपला कारखाना स्थापनेपासून कार्यक्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सभासद इ. चे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. या भरारी पथकाच्या प्रमुख मा. सौ. डॉ. शैलजा पाटील-तहसिलदार, कडेगांव यांनी आपल्या कारखान्याच्या वजनकाट्यास त्यांच्या भरारी पथकासह अचानक भेट देवून प्रत्यक्ष ऊसासह वाहनाचे वजन वजनकाट्यावर करुन नंतर ऊस गव्हाणीमध्ये उतरुन ती वाहने जशीच्या तशी परत वजनकाट्यावर घेतली असता सर्वांसमक्ष वजने तपासली असता वाहनाचे वजन व ऊस वजन बरोबर असलेचे निदर्शनास आले. त्यानुसार त्या भरारी पथकांनी प्रत्यक्ष सह्या करुन आपल्या कारखान्याचा वजनकाटा निर्दोष असलेचा तपासणी अहवाल सादर केला.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन-पोपटराव महिंद, तज्ञ संचालक - मा. श्री. रघुनाथराव कदम, बापूसो पाटील,निवृत्ती जगदाळे, दिलीपराव सुर्यवंशी आणि कार्यकारी संचालक-शरद कदम तसेच खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments