Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मसुचीवाडी सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे ; उप सरपंच पदी शांताराम कदम

वाळवा (रहिम पठाण)
मसुचीवाडी ता. वाळवा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उप सरपंच पदाच्या निवडीसाठी नुतन सदस्यांची बैठक पार पडली. सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे यांची तर उप सरपंच श्री शांताराम कदम यांची बिनविरोध निवड झाली यावेळी

निवडीवेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तू रत्तू खोत (आप्पा) व ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्जेराव कदम बापू व गावातील प्रमुख नागरीक उपस्थित होते. परंपरागत विरोधक एकत्र येऊन यावेळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे खूप प्रयत्न झाले. परंतु एकूण 11 जागापैकी 9 जागा बिनविरोध झाल्या तर 2 जागांची निवडणूक लागली होती. हे दोन्हीही गट मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब याना मानणारे होते. यावेळी सर्व नागरीकांनी सरपंच व उप सरपंचांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments