Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतचे नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

जत, (प्रतिनिधी)
जत नगर पालिकेचे नगरसेवक तथा भाजपचे तरुण नेते उमेश जयसिंगराव सावंत यांच्यावर जत पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी  गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी जत पोलीस ठाण्याच्या परिसरात कोळगिरी येथील डंपर चालक राजू सदाशिव साळुंखे याच्या सोबत सावंत यांची वादावादी झाली होती, यावेळी सावंत यांनी साळुंखे याच्या अंगावर फॉरचूनर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनतर राजू साळुंखे याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
 
अधिक माहिती अशी, राजू साळुंखे हा पूर्वी उमेश सावंत यांच्या डंपरवर चालक म्हणून काम करत होता, अलीकडे त्याने सावंत यांचे काम सोडले होते, तसेच बोर नदीतील वाळू उपशावरूनही वाद सुरू होता, मंगळवारी दुपारी साळुंखे हा जत प्रांत कार्यालयात कामासाठी आला होता, तिथे उमेश सावंत देखील होते, या दोघांत सुरवातीला शाब्दिक चकमक झाली, हा वाद वाढत जाऊन प्रकरण हाणामारी पर्यंत आले. यावेळी फिर्यादी पोलीस ठाण्यात जात असताना सावंत यांनी त्याच्या अंगावर चारचाकी गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला तसेच शिवराळ भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार फिर्यादी राजू साळुंखे याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे, पोलिसांनी सावंत यांच्यावर 307, 324,504,506 या कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे, तपास जत पोलिस करत आहेत.


Post a Comment

0 Comments