Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत पवार यांची निवड

पेठ (रियाज मुल्ला)
वाळवा तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत पवार यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी पेठ च्या सरपंच मीनाक्षीताई महाडिक होत्या. 
यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवडणूक प्रक्रिया पार पडली. नुतन उपसरपंच म्हणून चंद्रकांत पवार यांची निवड जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली.

नूतन उपसरपंच चंद्रकांत पवार व मावळते उपसरपंच दिलीप कदम यांचा पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि. प. बांधकाम समिती अध्यक्ष जगन्नाथ माळी, पंचायत समिती सदस्या सौ. वसुधा दाभोळे, मुस्लिम जमातचे चेअरमन जवाहर ढगे, उत्तर भाग सोसायटीचे माजी चेअरमन विशाल शेटे, उत्तर भाग सोसायटीचे संचालक सयाजी कदम (व्यंकटराव), माजी उपसरपंच अमीर ढगे, माजी उपसरपंच शंकर पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्या बेगमबी जमादार, सौ संगीता शेलार, सौ उषा मदने ,सौ ज्योत्स्ना गुरव ,सौ लताबाई कदम ,भगवान कदम ,भानुदास गुरव, संतोष माळी ,मुस्लिम जमात संचालक इरफान ढगे ,विकास दाभोळे ,गोरख मदने, सागर शेलार, बरकतअल्ली जमादार ,युवराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कृष्णात पाटील (एल के)यांनी तर आभार शंकर पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments