Daily Mahasatta

Daily Mahasatta

सक्तीने फी आकारणाऱ्या कॉलेज विरोधात तीव्र आंदोलन करणार : पवन कोळी

जत (सोमनिंग कोळी)
करोनाकाळात पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. यातच शाळांकडून शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. यात स्कूल बस, प्रयोगशाळा आदी शुल्कवसुली होत आहे. याला विरोध करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष पवन कोळी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे हेमंत चौगुले, अशोक कोळी, हेमंत खाडे उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतीही खासगी शाळा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना काढु टाकु शकणार नाही, असे आदेशच सर्व शाळांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तरी बोर्डाचे ऑनलाईन फॉर्म तसेच प्रॅक्टीकल परिक्षा या करीता विद्यार्थ्यांकडुन फी सक्तीने वसुली करत आहेत. त्या शिवाय बोर्डाचे फॉर्म भरले जाणार नाहीत व तुमचे शेक्षणिक वर्ष वाया जाईल असा दबाव टाकत आहेत. ज्या शाळांकडुन असे प्रकार केले जातील त्यांचेवर आपलेमार्फत योग्य ती कारवाई करावी व त्यांना सुचित करावे की, विद्यार्थ्याच शैक्षणिक नुकसान करु नये व फी साठी सक्ती करु नये व तगादा लावु नये.

तरी सदर बाबीचा गांभीर्याने विचार करुन संबधित शाळा, कॉलेज, हायस्कुल व खाजगी क्लालेस यांना योग्य सुचना द्याव्यात. अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संबधीतांची पालकमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण विभाग यांचेकडे लेखी तक्रार करेल व त्यांच्यावर कडक कारवाई करणेसाठी आग्रही राहील.

Post a Comment

0 Comments