Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

जतमधील माडग्याळ जवळ पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जत (सोमनिंग कोळी) - जत तालुक्यातील माडग्याळ पासून दोन किलोमीटर अंतरावर ईसार पेट्रोल पंपाच्या जवळ बोलेरो पिकप गाडी मोटरसायकलस्वार जाऊन आदळल्यामुळे एकजण  जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. नागेश धर्मराया हत्तळी (वय 35 रा. बेंळोडगी, ता. जत) असे मयत तरुणाचे नाव आहे, हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , व्होसपेठ ता.जत येथील बुलोरा पिकअप ही गाडी ही होसपेठ गावाकडे निघाली होती. अंबाबाई मंदिराच्या जवळ  पिकअप चे एक्सेल तुटल्यामुळे वेगात आसणाऱ्या पिकअप ने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील नागेश धर्मराया हात्तळी हे डांबरी रस्त्यावर आदळून व पिकअप अंगावर गेल्याने ते जागीच ठार झाले.

तर त्यांच्या सोबत असणारे गुरू मलकरी हात्तळी हा गंभीर जखमी झाला आहे.बेंळोडगी येथील हे दोघेही जतला शेतीच्या कामासाठी गेले असल्याचे समजते. जत मधील काम आटोपूनआपल्या बेंळोडगी या  गावी निघाले होते. माडग्याळ जवळ येताच बोलोरो गाडी समोरून येऊन मोटरसायकल वरच पलटी झाली. यामुळेच मोटारसायकल वरील नागेश हात्तळी हा युवक जागीच ठार झाला आहे. या अपघाताची नोंद उमदी पोलिसात झाली आहे.

Post a comment

0 Comments