Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगी येथील न्यू इंग्लिश स्कूल भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत

: डॉ . विश्वजित कदम यांनी इमारत बांधकामाचे दिले आहे आश्वासन .

कडेगाव , (सचिन मोहिते )
वांगी (तालुका कडेगाव ) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे असणारे न्यु इंग्लिश स्कूल वांगी या शाळेची नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभाच्या प्रतीक्षेत सर्व ग्रामस्थ असून भूमिपूजन कधी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

न्यू इंग्लिश स्कूलच्या सद्याच्या इमारतीचे बांधकाम बर्‍याच वर्षापूर्वीचे जुने असुन काही महिन्यांपूर्वी कडेगाव - पलुस मतदार संघाचे आमदार व कृषी सहकार मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांची गावातील काही जाणकार मंडळी तसेच मुख्याध्यापक यांनी भेट घेऊन इमारत बांधकामाविषयी चर्चा करून शाळेला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. गावकऱ्यांच्या शब्दाला मान देत काही दिवसातच विश्वजीत कदम यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी इमारत बांधकाम भूमिपूजनाचा समारंभ लवकरच घेऊ असे अभिवचन दिले होते.

परंतु कोरोना च्या महामारित सर्वच कामे ठप्प झाल्याने या विषयाला कुठेतरी बघल मिळाली होती. परंतु आता सर्व कामे सुरळीत सुरू असून कोराणाचे प्रमाणही कमी झालेले आहे. त्यामुळे वांगी येथील शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन समारंभ कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ?

----------------------
डॉ .विश्वजीत कदम
दिलेला शब्द पूर्ण करणार ?

स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे प्रमाणेच दिलेला शब्द पूर्ण करण्याची धमक त्यांचे चिरंजीव मंत्री डॉ .विश्‍वजित कदम यांच्यात असून त्यांनी वांगी गावातील जनतेस शाळा इमारत बांधून देतो हा दिलेला शब्द ते नक्कीच पूर्ण करतील, अशी चर्चा जनतेतून होत आहे. कारण समाज कार्याविषयी असणारी तळमळ व जनतेचे हित हा स्व . डॉ .पतंगराव कदम साहेबांच्या अंगी असणारा गुण डॉ .विश्वजीत कदम यांच्यात पुरेपूर ठासून भरलेला आहे .

Post a Comment

0 Comments