Daily Mahasatta

Daily Mahasatta

जयंत चषक स्पर्धेत एम. एम. ग्रुप संघाला अजिंक्यपद

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ ता. वाळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत एम .एम. ग्रुप च्या संघाने शिव शक्ती स्पोर्ट्स मालेवाडी या संघावर मात करीत प्रथम क्रमांक पटकावून जयंत चषकावर नाव कोरले. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या हापपीच क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व युवा नेते अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.

प्रथम क्रमांकाचे बक्षीस आत्मशक्ती पतसंस्थेचे चेअरमन हंबीरराव पाटील यांच्या हस्ते १५००१ रुपये व चषक एम .एम .ग्रुप या संघाला देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शरद पाटील यांच्या हस्ते ११००१ रुपये व चषक शिवशक्ती स्पोर्ट्स मालेवाडी या संघाला देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्या हस्ते ७००१ रुपये व चषक आष्टा स्पायडर्स आष्टा या संघाला देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती विजय द. पाटील यांच्या हस्ते ५००१रुपये व चषक आर .पी . टायगर इस्लामपूर या संघाला देण्यात आले. सर्व विजेत्या संघांना संग्राम कदम यांच्याकडून हे चषक देण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विघ्नहर्ता पतसंस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष भांबुरे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव भांबुरेसर यांनी तर आभार रविकिरण बेडके यांनी मानले.

सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी शिवराज पाटील, विनायक बेडके, शिवप्रसाद बेडके, चंद्रसेन कदम, अविष्कार पवार विश्वजीत पाटील, दिपक नायकल, आशिष नायकल, सागर पवार, प्रसाद माळी, संग्राम शिद, धनंजय येडगे ,शुभम माळी, कृष्णात पाटील, उत्कर्ष भंडारी, अजिंक्य पाटील, महेश पाटील, पार्थेश पाटील, निखिल पाटील , प्रसाद माळी, अमरीश पाटील ,संतोष बाबर, श्रेयस गाताडे, लखन सपकाळ तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी, अतुल पाटील मित्र परिवार ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी सोशल मीडिया यांनी प्रयत्न केले.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंग भाऊ नाईक यांचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा नेते अतुल पाटील यांचे कट्टर समर्थक तुळशीदास पिसे यांचा वाढदिवस निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघटनेत पेठेतील पत्रकारांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माजी सरपंच हेमंत पाटील, डॉ. अभिजीत पाटील, भागवत पाटील, हणमंत कदम, ग्रा. प. सदस्य नामदेव पेठकर , अंबादास पेठकर, शाहूराज पाटील ,जयंत ज. पाटील ,ज्ञानेश्वर पेठकर, विकास पेठकर, प्रथमेश देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments