Daily Mahasatta

Daily Mahasatta

लिंगायत धर्मास शासन मान्यता द्या : लिंगायत धर्म बचाव समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

विटा (मनोज देवकर )
लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात केली. अनेक राज्यांनी या धर्मास राजाश्रय दिला. पण १९५१ पासून प्रयत्न करूनही सरकारने लिंगायत धर्मास मान्यता न दिल्याने या धर्माचे आणि पोटजातींचे आर्थिक आणि शैक्षणिक फार मोठे नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता रद्द करून आमच्यवर फार मोठा अन्याय झाला आहे, असे निवेदन लिंगायत धर्म बचाव समितीने जिल्हाधिकारी यांना दिले.

या समितीच्या वतीने मिरज येथे मालिकार्जुन मंदिराच्या मैदानात समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. लिंगायत धर्माला शासन मान्यता मिळावी आणि लिंगायत धर्मियांच्या साठी जनगणनेचा वेगळा कॉलमकरून त्यामध्ये पोटजातीचा समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जोपर्यंत लिंगायत धर्मियांची स्वतंत्र जनगणना केली जात नाही तोपर्यंत २०२१ च्या जनगणनेस लिंगायत समाज सहकार्य करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

या बैठकीस संस्थापक भक्तराज ठिगळे , विरशैव पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कल्लोळे , श्रीकांत महाजन, सागर दरबारे, प्रविण यादवाडे, विद्याधर लकडे, दिलीप शिंदे, शिवकुमार लकडे, सचिन रावळ, संदेश कराडे, राजु कराडे. महेश कराडे, संग्राम नष्टे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. आभार सचिन कोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments