Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत परिसरात धवल क्रांतीची दारे खुली : आमदार विक्रमसिंह सावंत

जत (सोमनिंग कोळी)
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे आम्ही सर्व कायदेशीर पूर्तता करून धानम्मा देवी जत तालुका दुध संघास मान्यता मिळवली आहे. या संघाचा शुभारंभ रविवार 21 रोजी जत लगतच्या तिप्पेहळी रोडवर होत आहे. त्यामुळे जत परिसरात आता धवल क्रांतीची दारे खुली होतील, असा विश्वास संघाचे मुख्यप्रवतर्क आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आ. विक्रमदादा सावंत म्हणाले, जत तालुका दुष्काळी भाग आहे. येथे शेती सोबत पशुपालन आणि दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. परंतु या उत्पादकांना चांगला दर पशु वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे नाहीत. शिवाय दुधावर प्रक्रिया करून रोजगार निर्मिती व आर्थिक दृष्ट्या चांगले धैर्य आणण्यासाठी तालुका दुध संघ स्थापन व्हावा, अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी होती. आपण विधानसभेच्या निवडणुकीत असे अभिवचन दिले होते. त्यानुसार मंत्रालय स्तरावर सर्व नियम व कागदपत्रांची पूर्तता करून धानम्मा देवी जत तालुका दुध संघ या संस्थेत मान्यता मिळवली आहे.

यावेळी उपाध्यक्ष महादेव दुधाळ, अंड युवराज निकम ,संचालक आप्पाराया बिराजदार,अण्णासाहेब सावंत,भूपेंद्र कांबळे, अतुल मोरे, धैर्यशील सावंत, रोहित शिंदे, धनाजी शिंदे महेश पाटील, रमेश शिंदे , रावसाहेब मंगसुळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments