Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुस्लिम युवतींनी साजरी केली शिवजयंती...परिसरातून कौतुकाचा वर्षाव

पेठ (रियाज मुल्ला)
जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पेठ ता. वाळवा येथील रुबीना नजीर मुल्ला व फरीदा नजीर मुल्ला या मुस्लीम युवतींनी लहान मुलांना मिठाई वाटप करून एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे पेठ पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

नेहमीच वेगवेगळे सामाजिक कार्य करणाऱ्या रुबीना ,फरीदा व त्यांचे बंधू नईम मुल्ला यांनी कोरोना च्या काळात कासेगाव ते वाघवाडी हायवे परिसरात ऊन पावसाची तमा न बाळगता उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चहा -नाश्ता व नारळ पाणी देण्याचे कार्य केले होते. 26जानेवारी व 15 ऑगस्ट ला हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे संदेश देणारे डिजिटल फलक लावणे, रक्षाबंधन सणाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या फौजी बांधवांना राख्या पाठवणे असले सामाजिक उपक्रम या दोन युवती नेहमीच राबवत असतात.

आज शिवजयंतीचे औचित्य साधून या युवतींचे वडील पेठेचे प्रसिद्ध शायर व आदर्श कलारत्न पुरस्कार विजेते नजीर हुसेन गुलाब मुल्ला यांच्या हस्ते शिंपी समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करून शिंपी समाजाने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी शिंपी समाजाचे अध्यक्ष निलेश भांबुरे, उपाध्यक्ष विकास दाभोळे ,विकास पेठकर ,अंबादास पेठकर ,दीपक दाभोळे ,रोहित पेठकर ,सौरव भांबुरे, सोमनाथ जाधव ,हणमंत जाधव, हंबीरराव पाटील आदी मान्यवर तसेच शिंपी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments