Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ येथे जयंत चषक स्पर्धेच्या दुसर्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ

पेठ : जयंत चषक स्पर्धेचा शुभारंभ करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संग्रामदादा पाटील व अन्य.

पेठ (रियाज मुल्ला)
जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आयोजित केलेल्या भव्य नाईट हापपीच क्रिकेट स्पर्धेचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराजदादा पाटील व वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संग्रामदादा पाटील यांच्या हस्ते दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.

पेठ नगरीचे युवा नेतृत्व अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या जयंत चषक स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. प्रथम क्रमांक चे १५००१ चे बक्षीस कै. हणमंतराव पाटील बुवा यांचे स्मरणार्थ आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पेठ यांचेकडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ११००१ चे बक्षीस कै. भीमराव पाटील यांचे स्मरणार्थ शरद पाटील यांचे कडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे ७००१ चे बक्षीस संदीप पाटील यांच्याकडून तर चतुर्थ क्रमांकाचे ५००१ चे बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय द. पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. सर्व विजेत्या संघांना संग्राम कदम यांचेकडून चषक देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक रविकिरण बेडके यांनी केले आभार विकास जानकर यांनी मानले. या जयंत चषकाचे आयोजन शिवराज पाटील ,विनायक बेडके, शुभम माळी ,कृष्णात पाटील, चंद्रसेन कदम ,उत्कर्ष भंडारी ,अजिंक्य पाटील , पार्थेश पाटील, महेश पाटील निखिल पाटील, प्रसाद पाटील, अमरीश पाटील, श्रेयस गाताडे , लखन सपकाळ ,संतोष बाबर तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी पेठ, अतुल पाटील मित्र परिवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी सोशल मीडिया पेठ आदींनी केले .

याप्रसंगी हंबीरराव पाटील ,शिवाजी खापे, हेमंत पाटील, भागवत पाटील, अभिराज पाटील, संदीप पाटील,सम्राट पाटील,शाहुराज पाटील, शरद पाटील ,हणमंत कदम ,अशोक पाटील ,एम एस पाटील, डॉ. सुभाष भांबुरे, धनंजय येडगे, प्रसाद माळी, विश्वजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Read more News

Post a Comment

0 Comments