Daily Mahasatta

Daily Mahasatta

आष्टा शहरातील घरकुल वाटपाची चौकशी करावी

: कै बापुसो शिंदे सेवाभावी संस्थेची मागणी

आष्टा ( रुपेश रुगे )
आष्टा येथे शासनाच्या माध्यमातून गरजू कुटुंबाना घरकुल वाटप करण्यात आले आहेत. शासन नियमानुसार या घरकुलांची विक्री करता येणार नाही किंवा भाड्याने देता येणार नाही. पण या घरकुलांची सर्रास विक्री केली जात आहे. बरीच घरकुल भाड्याने देण्यात आली आहेत. आष्टयांमध्ये बरीच गरिब कुटुंब असताना देखील आष्ट्या बाहेरील लोकाना घरकुल वाटप झालेलआहे, याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी कै बापुसो शिंदे बहूद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, आष्टा येथे एकाच कुटुंबा मध्ये जास्त घरकुल देण्यात आली आहेत. घरकुल देत असताना आखणी योग्य न झाल्याने एकास जास्त जागा व एकास कमी जागा दिली गेली आहे. नगरपालिकेने ज्या कुटुंबांना घरकुल दिली गेली आहेत ते लोक त्या ठिकाणी रहातात का? याचा वर्षातून एकदा तरी सर्व्हे करणे गरजेच आहे. या बाबत कै. बापुसो शिंदे बहू उद्देशीय सेवाभावी संस्थेकडुन निवेदन देऊन ही नगरपालिकेने लक्ष दिले नाही.

यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात सविस्तर चर्चा केल्या नंतर याबाबत कारवाई करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. कै बापुसो शिंदे बहू उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सामजिक कार्याची त्यांनी माहिती घेतली व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे व शहाजान जमादार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments