Daily Mahasatta

Daily Mahasatta

देवराष्ट्रे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार आढळल्यास कठोर कारवाई : गटविकास अधिकारी यांनी दिले पत्र

कडेगाव : सचिन मोहिते
देवराष्ट्रे ग्रामपंचायत बरखास्त करा, तसेच देवराष्ट्रे गावातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागण्यांसाठी पंचायत समिती कडेगाव कार्यालयासमोर ग्रामस्थ्यांच्या वतीने करणेत आलेले लाक्षणिक धरणे आंदोलन गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर स्थगित करणेत आले.

देवराष्ट्रे ग्रामपंचायतीत आर्थिक भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झाला असून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत याबाबत चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी देवराष्ट्रे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र यावर चौकशी संथगतीने होत असलेने आज त्वरित चौकशी करून कारवाई करत ग्रामपंचायत बरखास्त व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निलंबन करणेच्या मागणीसाठी देवराष्ट्रे ग्रामस्थानी पंचायत समिती समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले होते.

याबाबतचा तपास सुरु असून येत्या १५ दिवसात चौकशी पूर्ण करून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणेचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल अशा आशयचे पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिलेनंतर आंदोलन स्थगित करणेत आले.

यावेळी सुधीर थोरात, राजेश गायगवाळे, प्रल्हाद मिसाळ, सतीश येताळ, डॉ. राजेश साठे, नितीन रसाळ, अभिजित जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच या आंदोलनास शेतकरी संघटना, रिपाई व वंचित आघाडी यांनी पाठिंबा दिला. यावेळी १५ दिवसात कारवाई न झालेस तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकानी दिला.

Post a Comment

0 Comments