Daily Mahasatta

Daily Mahasatta

ट्रकची चाके रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी

रस्त्यांची कामे निकृष्ट : शिवसेना आक्रमक

विटा ( मनोज देवकर )
विट्यात आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची चाके भर रस्त्यात रुतल्याने विटा मायणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबळी . त्यातच सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून खड्डे मुजवण्यासाठी काळी माती वापरल्याचा आरोप शहरातील शिवसैनिकांनी केला आहे. हा रस्ता राज्यमार्ग असून तिथे ऊसाची लागण करायची का? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे.

आज सकाळी विटा मायणी रस्त्यावर ट्रक चाक रुतल्याने अडकून पडला. या रस्त्याची आधीच दुरवस्था झाली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर बसून आंदोलन ही केले होते. सदर रस्त्याचे तातडीने काम करा नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा विटा शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
-----------------------------------

" विटा मायणी रस्त्यावरील पुलाचे आणि त्याजवळील ५० फूट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. विटा नगरपालिका जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असेल तर आम्ही नगरपालिकेत जाऊन जाब विचारू .!"
मा. राजू जाधव,
शिवसेना शहर प्रमुख .

------------------------------

" वारंवार पाठपुरावा करून ही नगरपालिकेच्या हद्दीतील विटा मायणी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे दिसत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम चालले आहे. आतातरी नगरपालिकेने दखल घ्यावी. होणारा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा ही आमची मागणी आहे."
: संजय भिंगारदेवे ,
माजी उपनगराध्यक्ष

Post a Comment

0 Comments