Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगावच्या प्रभारी प्रांताधिकारी आयुषी सिंह यांची वाळू तस्करावर धडक कारवाई

कडेगाव : सचिन मोहिते
प्रशासनाने वाळु तस्करीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नादिकाठचे स्थानिक शेतकरी व जनतेमधुन केला जात आहे. यातच कडेगाव उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार घेऊन कामावर रुजु झालेल्या आय. ए. एस. अधिकारी आयुषी सिंह यांनी वाळू उपसा करणाऱ्यांना पहिल्याच दिवशी कारवाई कारवाई करत वाळु तस्करांची झोप उडवली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, सोमवारी कडेगाव उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेल्या आय. ए. एस. अधिकारी आयुषी सिंह यांनी त्याच रात्री वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेत स्वतः वांगी कडे जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्यांनी सोबत स्थानिक प्रशासनाला न घेता स्वतःचा ड्रायव्हर, एक शिपाई आणि पोलीस कर्मचारी घेतले होते.गाडीतून निघताना त्यांनी दूरध्वनी यंत्रणा व मोबाईल यंत्रणा बंद ठेवली असल्याचे समजते .या दरम्यान वांगी कडे पथकासह जात असताना वाळू ने भरलेला डंपर आढळुन आला. या डंपर वरती कारवाई करीत वाळुन भरलेल्या वाहनातून गळत असलेल्या पाण्यावरून माग काढत त्यांनी थेट नदीचे पात्र गाठले. मात्र तोपर्यंत वाळू तस्कर सावध होऊन वाहने बाहेर घेऊन पसार झाले होते.

काहीच दिवसापूर्वी वांगी येथे वाळू तस्करी वरून दोन गटात जोरदार वाद झाला होता परंतु हे प्रकरण परस्पर मीटविन्यात आले असल्याची चर्चा मात्र नतेमधुन अजुन होत आहे . यातच अचानकपणे प्रभारी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्या नंतर पहिल्याच दिवशी कारवाई केल्याने वाळू तस्कर मात्र सैरभैर झाले असुन . तालुक्यात या कारवाईचीच चर्चा सुरु होती.

Post a Comment

0 Comments