Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत नगर पालिकेच्या समिती सभापती निवडी बिनविरोध

भाजपला मिळाली एक समिती : काँग्रेस दोन, राष्ट्रवादीला दोन समित्या

जत, (सोमनिंग कोळी)
जत नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडी शुक्रवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत प्रथमच भाजपला एक समिती मिळाली आहे. तर काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन समित्या मिळाल्या आहेत,

पालिकेच्या विषय समितीच्या निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होती. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज दाखल केले होते. या निवडीकरिता भाजपने देखील अर्ज दाखल केला होता, कोरम पूर्ण होत नसल्याने तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत या समित्या वाटून घेतल्या, यात भाजपला प्रथमच संधी मिळाली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे व मुख्याधिकारी मनोज देसाई यांनी निवडी जाहीर केल्या,

नव्याने झालेल्या निवडीत बांधकाम सभापतीपदी काँग्रेसचे नामदेव काळे, महिला बालकल्याण सभापती गायत्रीदेवी शिंदे ,स्वछता आरोग्य सभापती बाळाबाई मळगे, पाणी पुरवठा सभापती भारती जाधव तर शिक्षण क्रीडा सांस्कृतिक सभापतीपदी भाजपचे प्रकाश माने यांच्या निवडी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी नुतून सभापती यांचा सत्कार नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवर ,उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे गटनेते साहेबराव कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते स्वप्निल शिंदे , नगरसेवक भुपेंद्र कांबळे , नगरसेविका कोमल शिंदे आदी उपस्थित होते.
0000000000000000

नाराजी नाट्य
या निवडीत राष्ट्रवादी व भाजप मधील अंतर्गत नाराजी नाटय दिसून आले, भाजपचे गटनेते विजय ताड, जयश्री शिंदे, प्रमोद हिरवे हे तीन तर राष्ट्रवादीचे लक्ष्मण उर्फ टीमु एडके, वनिता साळे असे पाच नगरसेवक गैरहजर होते,

Post a Comment

0 Comments